विठ्ठला, संभाळून घे रे आम्हाला…; भेटीला गेल्यावर भुजबळांनी थेट पवारांचे पायच धरले!
Chagan Bhujbal Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करुन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार यांना माणणारे असे दोन गट तयार झाले आहेत. त्यातच आता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची वाय.बी चव्हाण सेंटरवर भेट घेतली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यासमोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत पवारांच्या पाया पडले, त्यानंतर सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडले, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.(mumbai Y.B. Chavan Centre ajit pawar Chagan Bhujbal meet sharad pawar praful patel ncp)
घटनाबाह्य आणि कलंकित सरकारबरोबर चहापान घेणार नाही, विरोधी पक्षांचा बहिष्कार
वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी वाय.बी. सेंटरवर भेट घेतली. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना विठ्ठला सांभाळून घे रे असे म्हणत पवारांच्या पाया पडले. यावेळी सर्वच मंत्री पवारांच्या पाया पडले आणि हात जोडले. नवनिर्वाचित मंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार? ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक
या भेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. हे मंत्री शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समजताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील तात्काळ वाय.बी.चव्हाण सेंटरवर दाखल झाले.
शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधून त्याबद्दल माहिती दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार हे आम्हा सर्वांचे दैवत आहेत, त्यांची आम्ही आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट आम्ही घेतली असेही यावेळी सांगितले.
शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचे समजले. त्यामुळे आपण वेळ न मागताच या ठिकाणी आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादी एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात त्यांनी योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणीही यावेळी केली, शरद पवारांनी आपलं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असेही यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले.