Download App

Maharashtra Politics Live Update : मुख्यमंत्रीपदी भाजपचा चेहरा; एकनाथ शिंदेंचा पत्ता कट

आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण

  • Written By: Last Updated:

Maharashtra Chief Minister BJP : महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय मिळाला असला तरी तो महायुती म्हणून विजय आहे अशी स्थिती आहे. त्यामध्ये मोठा आकडा भाजपचा असला तरी ते बहुमतात नाहीत. (BJP ) त्यामुळे गेली दोन दिवसांत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत स्पष्टता आलेली नाही. दरम्यान, आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण असून एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट होण्याची शक्यात आहे. या सर्व घडामोडींची अपडेट जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठी सतत तपासत रहा. आपल्याला येथे सर्व अपडेट मिळतील.

निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये निवडणूक काळापुरताच त्यांची बदली केल्याचं म्हटलं होतं. खरं म्हणजे असं होत नाही. रश्मी शुक्ला यांच्या नेमणुकीबाबत वाद आहे. अडीच वर्षांपूर्वीसुद्धा अशाच प्रकारे त्यांची नेमणूक झाली आणि आताही होईल. भविष्यामध्ये अशा घटना बेकायदेशीर बदल्या आणि नियुक्त्या होत राहतील, त्या आपल्याला सहन कराव्या लागतील. कारण सैतानी बहुमत मिळालेलं सरकार महाराष्ट्रावर लादण्यात आलं आहे.

बहुमत लोकशाही मार्गाने आलेले नसून असंख्य घोटाळ, पैसे आणि यंत्रणांचा वापर करून मिळालं आहे. येणाऱ्या सरकावर कोणतंही नियंत्रण नसेल, हे बेफाम सरकार असेल. त्याच्यामुळे रश्मी शुक्लांसह अन्य कोणाच्या नेमणुका होतील यावर बोलणं म्हणजे भींतावर डोकं आपटून घेतल्यासारखं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारला प्रश्न विचारावे लागतील, जिथे सरकार चुकत आहे तिथे बोट दाखवावे लागेल. मुंबई असेल दिल्ली असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरही आम्हाला प्रश्न विचारावे लागतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अदानी यांच्याविरोधात बोलायला सुरूवात करण्याआधी राज्यसभा सभापतींनी सभागृह बरखास्त केले. जर महाराष्ट्राच्या विधानसभागृहात अशी हुकुमशाही दिसली तर जनतेने आम्हाला ताकद दिली आहे, आम्ही लढत राहू, असं संजय राऊत म्हणाले.

No liveblog updates yet.

LIVE NEWS & UPDATES

follow us