‘ज्या काँग्रेसनं आम्हाला तुडवंल, संपवलं त्यांच्यासोबत तुम्ही’.. गुलाबराव ठाकरेंवर भडकले!

Gulabrao Patil : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे हल्ले सुरूच आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कमालीचे आक्रमक असून कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेत असतात. आताही त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. गुलाबराव पाटील शनिवारी रायगडमध्ये होते. यावेळी ते […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (83)

Gulabrao Patil

Gulabrao Patil : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे हल्ले सुरूच आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कमालीचे आक्रमक असून कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेत असतात. आताही त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे.

गुलाबराव पाटील शनिवारी रायगडमध्ये होते. यावेळी ते म्हणाले, ‘ज्या काँग्रेसने आम्हाला तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत तुम्ही (उद्धव ठाकरे) मांडीला मांडी लावून बसला आहात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. आधी छगन भुजबळांना फोडलं. मग, नारायण राणे त्यानंतर राज ठाकरे यांना फोडलं. आज तुम्ही त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांबरोबर जाऊन बसला आहात.’

‘आमचा पक्ष फोडणाऱ्यांच्या बरोबर जाऊन बसले आणि आम्हाला मात्र गद्दारांच्या रांगेत उभं केलं. 1992 च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप सुद्धा चार महिने तुरुंगात राहिला. फक्त शिवसेना हा शब्द रहावा म्हणून आम्ही हे बलिदान दिलं. शिवसैनिकांनी बलिदान दिलं’, अशा शब्दांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

CR Kesavan Join BJP : तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के! पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा पणतू भाजपात

दरम्यान, पाटील यांनी याआधीही महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्याने नेहमीच वाद ओढवून घेतला आहे. मात्र, तरी देखील त्यांची वक्तव्ये थांबलेली नाहीत. आताही त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंना टार्गेट केले आहे. नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने समर्थन दिल्याच्या मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानेही गदारोळ उठला होता. तसेच त्यांनी सट्टा लावून मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली होती.

Exit mobile version