Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. ज्या जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत त्या शिवसेनेच्याच राहतील असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा पुनरुच्चार करत राज्यात कर्नाटकचा फॉर्म्युला (Karnataka Elections) चालणार नाही येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचाचा फॉर्म्युला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी ठणकावून सांगितले.
खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना आता ज्यांचे जास्त प्रतिनिधी आहेत किंवा आमदार निवडून आले आहेत तो निकष न धरता आता जे जनमत आहे त्याचा विचार करावा. त्यासाठी कर्नाटकच्या निवडणुकीचा संदर्भ दिला जात असल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर राऊत म्हणाले, राज्यात कर्नाटकचा फॉर्म्युला चालणार नाही तर उद्धव ठाकरे यांचा फॉर्म्युला आहे असे सांगितले.
राष्ट्रवादीत लंकेंना आता टक्कर; लोकसभेसाठी बलाढ्य दावेदार वाढले !
लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक असेल यातील जागावाटपासंदर्भात अजून महाविकास आघाडीची कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणताही फॉर्म्युला तयार झालेला नाही. पण एक मात्र नक्की आता शिवसेनेच्या खासदारकीच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आमची मागणी सहाजिकच आहे ज्यांच्या जेवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या कायम ठेवायच्या आणि शिल्लक राहिलेल्या जागांत समान वाटप करायचे असा जर फॉर्म्युला आला तर त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार होऊ शकतो.
उद्धव ठाकरेंनी सांगितले, की ज्या ठिकाणी संबंधित पक्षाकडे निवडून येईल असा सक्षम उमेदवार नसेल आणि ज्या पक्षाकडे असा सक्षम उमेदवार असेल त्याठिकाणी जागावाटपाचे अदलाबदल होऊ शकेल. अशी चर्चाही महाविकास आघाडीत सुरू आहे. पण अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
उद्धव ठाकरेंच्या राक्षसी महत्वाकांक्षीमुळेच… आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल
कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही. येथे उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे हे आता दिसून येत आहे. त्यामुळे ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते चर्चेला बसतील त्यावेळी चर्चा होईल जागावाटपासंदर्भात योग्य तो फॉर्म्युला निघेल. पण, एक निश्चित आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यामातूनच लढविल्या जातील आणि या निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.