राष्ट्रवादीत लंकेंना आता टक्कर; लोकसभेसाठी बलाढ्य दावेदार वाढले !

राष्ट्रवादीत लंकेंना आता टक्कर; लोकसभेसाठी बलाढ्य दावेदार वाढले !

Ahmednagar Lok Sabha Constituency Election : राज्यात आगामी काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत मुंबईमध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काही उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्या दृष्टीने तयारी करत आहेत. परंतु राष्ट्रवादीकडून लोकसभा लढविण्यास इच्छुकांची यादी वाढली आहे. त्यात काही मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, आमदार सुनील तटकरे, खा. श्रीनिवास पाटील, आमदार हसन मुश्रीफ व राज्यातील इतर प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.

तसेच अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र फाळके, आ. प्राजक्त तनपुरे, आ संग्राम जगताप, माजी आ दादाभाऊ कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, घनःश्याम शेलार, अंबादास गारुडकर , राजेंद्र कोठारी हे देखील उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने लवकरात लवकर उमेदवार ठरवावा अशी मागणी यावेळी सर्वांकडून करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पारनेरचे आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. अरुणकाका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, २०१९ श्रीगोंद्यातून विधानसभेची उमेदवारी केलेले घन:श्याम शेलार हे इच्छुक आहेत.

नगरमध्ये खळबळ! माजी मंत्री राम शिंदेंसह कार्यकर्त्यास धमकी, गुन्हा दाखल

या मतदारसंघातून निलेश लंके हे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यामुळे ते खासदार सुजय विखे यांना थेट भिडतात. पण आता राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्याही वाढली आहे. यामुळे आगामी काळात उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि अपेक्षाभंगाचे नारळ कोणाला मिळणार याकडे नगरकरांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube