नगरमध्ये खळबळ! माजी मंत्री राम शिंदेंसह कार्यकर्त्यास धमकी, गुन्हा दाखल

नगरमध्ये खळबळ! माजी मंत्री राम शिंदेंसह कार्यकर्त्यास धमकी, गुन्हा दाखल

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय वाद वाढलेला असतानाच एक खळबळजनक घटना घडली आहे. आ. शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यास धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धमकी देणारा संशयित हा आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जामखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका युवकाने आ. शिंदे यांना धमकी दिली. याप्रकरणी अमित अरुण चिंतामणी (रा. जामखेड) जामखेड पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर सुभाष गवसणे (रा. पिंपळगाव उंडा, जामखेड) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणाऱ्याने सोशल मीडियाद्वारे लाइव्ह करत धमकी दिली. तो आमदार रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे समजते. या धमकीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘त्या’ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार; महसूलमंत्र्यांनी दिला इशारा

फिर्यादी चिंतामणी यांच्या मोबाइलवर एका नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने तुम्ही राम शिंदे यांच्या जवळचे आहात त्यांना जुळवून घेण्याचे सांग नाहीतर पाहून घेईन असे म्हणाला. त्यानंतर काही वेळाने मी राम शिंदे यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी मला सांगितले की सागर गवसणे नावाच्या व्यक्तीने याने फेसबुक लाइव्ह करत धमकी देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी मी सुद्धा हा व्हिडिओ पाहिला, असे अमित चिंतामणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube