Download App

जयंत पाटलांच्या चौकशीवर देशमुख भडकले; म्हणाले, ‘त्यांच्या’कडून राष्ट्रवादी काँग्रेसला..

Anil Deshmukh on MVA seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची काल ईडीने चौकशी केली. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची चौकशी झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही भाजपवर जोरदार प्रहार केले आहेत.

देशमुख म्हणाले, विरोधकांना टार्गेट करून त्रास दिला जात आहे. माझ्यावरही कारवाई केली गेली. पण, यातून काहीच निष्पन्न झाले नाही. विरोधकांना त्रास मात्र दिलाच जात आहे.

Loksabha Election : काँग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादीचा डोळा : पुण्यावरुन होणार घमासान?

मागील 50 ते 60 वर्षांच्या काळात राज्यात कधीही इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण झाले नाही. आता मात्र वातावरण बिघडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ठरवून त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे. राजकीय दबाव आणण्याचे षडयंत्र सुरू आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्याने काहीही फरक पडणार नाही.

राज्यात आणि देशात निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. यावरही देशमुख यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आजच्या परिस्थितीत आमचे आमदार आणि खासदार जास्त आहेत. मोठे भाऊ छोटे भाऊ असले तरी सर्वांचा एकमेकांशी प्रेमाचा व्यवहार आहे. यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही. तसेच या घडामोडींचा आघाडीच्या जागावाटपवर काहीही परिणाम होणार नाही. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव अटळ आहे, असे देशमुख म्हणाले.

Sharad Pawar : उद्धव ठाकरे, मी अन् खर्गे बसून ठरवू! अप्रत्यक्षपणे राऊतांना दिला ‘शांत राहण्याचा’ सल्ला

याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातही या मुद्द्यावर चांगलीच जुंपली होती. अजित पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने राज्यात राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे म्हणत पटोले यांना चिमटा काढला होता. पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरील वक्तव्याला अजित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिले होते.

Tags

follow us