धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवार साहेबांचा विरोधच पण..; आव्हाडांनी फोडलं मोठं गुपित!

Jitendra Awhad on Dhananjay Munde : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले.अजित पवार यांनी आ. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना घेऊन सरकारला पाठिंबा दिला. आता हे नेते सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवार यांनीच एकेकाळी विरोध […]

Dhananjay Munde And Sharad Pawar

Dhananjay Munde And Sharad Pawar

Jitendra Awhad on Dhananjay Munde : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले.अजित पवार यांनी आ. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना घेऊन सरकारला पाठिंबा दिला. आता हे नेते सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवार यांनीच एकेकाळी विरोध केला होता, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

शरद पवार मोदींसह एकाच मंचावर का हजर होते? जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं नेमकं कारण

शरद पवार यांच्यावर धनंजय मुंड यांना पक्षात घेऊन मुंडेंचे घर तोडल्याचा आरोप होतो आहे. या आरोपांवरही आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांचा याच्याशी काहीच संबंध नव्हता. याउलट त्यांचे मत घर तोडू नका असे होते. यासाठी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना फोन करून गोपीनाथराव घरातला वाद मिटवा, बाहेर जाताहेत हे होऊ देऊ नका, असा सल्ला देखील दिल्याचे आव्हाड म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना घरातून वेगळे केले ही अत्यंत चुकीची माहिती आहे. याची मी साक्षीदार आहे. शरद पवार यांनी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास जवळपास वर्षभर विरोध केला होता. पवार साहेबांनी स्वतः पंडित अण्णा मुंडे तीनदा सांगितले की मी हे करू शकत नाही. मला हे पटत नाही. घर फुटणे याच्यासारखं दुःख नाही.

अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट

शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांनाही फोन केला होता आणि सांगितले होते की गोपीनाथराव घरातला वाद मिटवा. हे होऊ देऊ नका असे त्यांना सांगितल्याचे आव्हाड म्हणाले. शेवटी धनंजय मुंडेच म्हणाले होते की तुम्ही प्रवेश दिला तर ठीक नाहीतर मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतो. त्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला, असेही आव्हाड यांनी मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात सांगितले.

Exit mobile version