शरद पवार मोदींसह एकाच मंचावर का हजर होते? जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं नेमकं कारण
Jitendra Awhad : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी पुण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजर राहू नये अशी विरोधकांनी विनंती केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींबरोबर पवार व्यासपीठावर उपस्थित होते. या घडामोडीची राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. विरोधी पक्ष नाराज असल्याचेही बोलले गेले. त्यानंतर आता या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. शरद पवार आणि त्या मंचावर का उपस्थित होते याचे उत्तरही आव्हाड यांनी दिले.
अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट
मला वाटतं की मी शरद पवारांना फार ओळखत नाही. पण शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाचे काही खास पैलू आहेत. ते वैचारिक विरोध कायम करत राहतील. पण वैयक्तिक द्वेष कधीच करणार नाहीत. पंतप्रधान मोदींसह ते ज्या कार्यक्रमात दिसले तेव्हा ते माझ्या अंदाजाप्रमाणे ठरवून गेले होते की आपल्याला काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकमान्य टिळकांविषयी बोलायचं आहे. तेच त्यांच्या भाषणातही दिसलं.
शरद पवार यांना अनेकांनी सांगितले होते की तुम्ही त्या मंचावर जाऊ नका. त्यावेळी पवार म्हणाले होते की त्याने काय फरक पडतो. शरद पवारांनी एकदा ठरवलं की मग ते त्यापासून मागे फिरत नाहीत. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते. त्यांची काहीच चर्चा झाली नाही. शरद पवारांबाबत मात्र तशी चर्चा झाली. पण मला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे. कोणत्याही अग्रलेखाने किंवा कुणी सांगितलं म्हणून ते त्यांची भूमिका बदलतील तर ते आजिबात शक्य नाही, असे आव्हाड मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात म्हणाले.
‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही चालवत? जयंत पाटलांचा खडा सवाल…
दरम्यान, या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनी हजर राहू नये. दिल्लीत यावे अशीही मागणी केली जात होती. संसदेच्या अधिवेशनात त्यावेळी दिल्लीतील बदल्यांसदर्भात सादर केले जाईल अशी शक्यता होती. त्यामुळे शरद पवार यांनी त्यावेळी दिल्लीत असावे अशी मागणी होती. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही विनंती केली होती. परंतु, तरीही शरद पवार पुण्यात कार्यक्रमाला हजर राहिले.