‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही चालवत? जयंत पाटलांचा खडा सवाल…
डीआरडीओचे अधिकारी प्रदीप कुरुलकरांचा खटला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत का चालवला नाही? असा खडा सवाल आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला आहे. सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना प्रश्नोत्तरांच्या तासात धारेवर धरलं जात आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाऐवजी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत खटला सुरु आहे. त्यावरुन जयंत पाटील यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आले आहेत.
सत्यजीत तांबेंना न्याय दिला… देवेंद्र फडणवीसांची नजर आता संग्राम थोपटेंवर!
जयंत पाटील म्हणाले, प्रदीप कुरुलकरवर देशद्रोहाचा खटला चालवायला हव,. त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही? याची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्या, अशी मागणीच जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
‘मेक इन इंडिया’साठी केंद्राचं मोठं पाऊल, लॅपटॉप, टॅबलेटच्या आयातीला लावला ब्रेक…
काही दिवसांपूर्वी डीआरडीओचे अधिकारी प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हसीनाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आलं. या प्रकरणाचा एटीएसकडे तपास देण्यात आला असून कुरुलकरच्या चौकशीनंतर त्याच्याविरोधात दोन हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा खटला ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत सुरु आहे.
दरम्यान, एटीएसने प्रदीप कुरुलकर याची कसून चौकशी केली. भक्कम पुरावे जमा केले. त्यानंतर त्याच्यावर पुणे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन हजार पानांच्या या दोषरोपपत्रात अनेक खुलासे केले आहेत.