अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट

अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट

Jitendra Awhad on Nitin Desai death : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. आर्थिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नितीन देसाई हे माझे खूप जवळचे मित्र होते. त्यांना अनेक लोकांनी ब्लॅकमेल केलं, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. (Jitendra Awhad on Nitin Desai death they said Many people blackmailed Desai)

देसाई यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर 252 कोटींच कर्ज असल्याची माहीती समोर आली. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता, असंही सांगण्यात येत आगे. दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, नितीन चंद्रकांत देसाई हे माझे खूप जवळचे मित्र होते. नितीन देसाई यांनी कधीही रसत्यावर डेकोरेशन केलं नव्हतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्या गणपतीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर भलंमोठं डेकोरेशन केलं. नितीन देसाई यांची ही पहिलीच रस्त्यावरची डेकोरेशन होती. देसाई यांच्या गेल्या तीन वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच, यादरम्यानच्या काळात त्यांच्या कुणा-कुणाशी भेटी झाल्या? कोण-कोण त्यांच्याविरोधात बोललं? या सगळ्यांची चौकशी केली पाहिजे. या चौकशींमधून सत्य बाहेर आलं पाहिजे नितीन देसाईंना अनेकांनी ब्लॅकमेल केले आहे. कोण आहे ते ब्लॅकमेलर? याचा शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे.

Rowman Powell : वडिलांनी केला मारण्याचा प्रयत्न पण आईने जन्म दिला, आज देशाचं नाव मोठं करतोय ‘हा’ खेळाडू… 

एडलवाईस फायनान्स कंपनीच्या मालकाचा नितीन देसाई यांच्या आत्महत्येशी काही संबंध असेल तर त्यालाही तुरुंगात टाका. त्याचवेळी नितीन देसाईंना अन्य कोणी-कोणी छळलं, हे त्यांच्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. त्यांच्या आत्महत्येशी गुजरातचा काहीही संबंध नाही. सर्व कनेक्शन एमएमआरडीए, मुंबईशी आहेत. माझा कोणावरही रोख नाही. पण पोलिसांनी योग्य शोध घेतला तर आरोपी आपोआप ताब्यात येईल, असं आव्हाड म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube