Download App

काँग्रेस-राष्ट्रवादीला झटका ! शेकडो सरपंचांसह माजी नगरसेवक शिंदे गटात

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या पक्षप्रवेशाचे मोठे सोहळे साजरे होत आहेत. सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. स्थानिक पातळीवरही हे प्रमाण वाढले आहे. याद्वारे महाविकास आघाडीला झटके बसत असताना आणखी एक जोरदार झटका मराठवाड्यातून बसला आहे.

परभणी जिल्ह्यातील 101 सरपंच, 39 माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवावस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. शिंदे गटाने काँग्रेससह राष्ट्रवादीलाही झटका दिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेससह विविध पक्षांतील 101 ग्रामपंचायतींचे सरपंच, 34 माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती यांचाही समावेश आहे. परभणीतील शिवसेना नेते सईद खान यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

परभणी जिल्ह्यातून आतापर्यंत 201 सरपंच आणि 64 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. सईद खान हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात तर येथील विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुराणी यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात.

ठाकरेंना सावरकरांचा खरंच आदर असेल तर.., रणजित सावरकरांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, परभणीतील हा पक्षप्रवेश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आगाम निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय पक्षांची समीकरणे यामुळे नक्कीच बिघडणार आहेत. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अधिक सतर्क होऊन राजकीय बांधणी करावी लागणार आहे. त्यानुसार राजकीय नेत्यांनाीह समीकरणे तयार करावी लागणार आहेत.

दुसरीकडे शिंदे गटाचे बळ मात्र वाढले आहे. आतापर्यंत फक्त ठाकरे गटालाच धक्के देणाऱ्या शिंदे गटाने या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार झटका दिल्याची चर्चा आहे.

 

 

 

Tags

follow us