ठाकरेंना सावरकरांचा खरंच आदर असेल तर.., रणजित सावरकरांनी व्यक्त केली नाराजी
मुंबई : स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सारवासारव सुरु असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.
नोकरी गमावलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडावी लागणार नाही…
दरम्यान, राहुल गांधींच्या सावरकारांबद्दलच्या वक्तव्यावरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेत राहुल गांधींना सुनावलं आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणार सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
‘उमेश पाल अपहरण’ प्रकरणात अतिक अहमदला दोषी ठरवणारे न्यायाधीश कोण?
रणजित सावरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांना खरंच स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी प्रेम असेल तर त्यांनी गप्प बसू नये. त्यांनी राहुल गांधींनी या प्रकरणी तत्काळ माफी मागावी. सावरकरांचा अवमान जर होत असेल तर सावरकरांसाठी जे उभे राहतात तेच खरे सावरकर भक्त असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
मोठी बातमी : फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब; मध्यरात्री नेमकं काय घडलं
आज राहुल गांधी गप्प बसलेत म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना माफ करणं हे योग्य नाही. त्यांना खरंच सावरकरांविषयी प्रेम असेल तर त्यांनी राहुल गांधींकडून माफी मागून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
या प्रकरणी रणजित सावरकरांनी उद्धव ठाकरेंवरही ताशेरे ओढले आहेत. आज उद्धव ठाकरेंनी जरी सावरकरांचा अवमान सहन करणार नसल्याची भूमिका घेतलीय पण ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र शिदोरी मासिकातून सावरकरांवर अश्लिल आणि आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली होती, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
तानाजी सावंत म्हणाले, सत्तापरिवर्तनाचं 2019 पासूनचं प्लॅनिंग… पहिली बंडखोरी कोणाची?
दरम्यान, सावरकर वादावर पडदा टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तसेच सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नसल्याचं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींना सुनावलं आहे.