Download App

‘बारसू’चे समर्थन करणाऱ्यांना मिळाले खोके; राऊतांचा धक्कादायक आरोप

Sanjay Raut in Barsu Refinery : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) विरोध वाढत चालला आहे. काल महाविकास आघाडीच्या सभेत या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्यात आले. आंदोललकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी या सभेत केला. त्यानंतर राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

राऊत म्हणाले, एका सौदी अरेबियाच्या म्हणजेच इस्लामिक राष्ट्राच्या प्रिन्सचा तो कारखाना आहे. त्याची गुंतवणूक तिकडे होत आहे. त्यातून काही लोकांना दलाली मिळणार आहे. किक बॅक मिळणार आहे. जे या रिफायनरीचे समर्थन करत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात खोके गेले आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. परप्रांतीय जमीनदारांचे जमिनीचे भाव खाली जाऊ नये म्हणून तुम्ही आमच्या स्थानिकांवर अन्याय करत आहात, सगळे स्थानिक आहेत. कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही गिळत असाल तर आम्ही विरोध करणारच, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले, अयोध्येचे आंदोलन करायला अयोध्येचे लोक होते का ? जेव्हा जेव्हा शेतकरी आणि कष्टकरी यांच्यावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा सर्व शेतकरी आणि कष्टकरी एकत्र येतात. दिल्लीला शेतकऱ्यांचे आंदोलन झाले तेव्हा संपूर्ण देशातून आणि महाराष्ट्रातून देखील शेतकरी गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतात बाहेरचे लोक होते पाकिस्तान, म्यानमार, सुदान, सीरिया इथले लोक होते का ? की परवा मॉरिशसला जाऊन आले तिथून एक विमान पाठवलं त्यांनी ? असे सवाल उपस्थित करत स्थानिकच लोक होते.

मुख्यमंत्र्यांनी उपचाराला गुवाहाटीला जायला पाहिजे, त्यांचा उपचार जादूटोणा, अंगारे यावर आहे. त्यामुळे ऍलोपॅथी त्यांना जमत नाही. आमचा उपचार करायला आम्ही समर्थ आहोत. आम्हाला ऑपरेशनची सवय आहे, त्याची सुरुवात झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us