शिंदे-फडणवीस सरकार फक्त तीन महिने, जावं तर लागणारच; राऊतांचा घणाघात

Sanjay Raut News : शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सरकारला जावंच लागणार आहे. या सरकारचे आता फक्त तीन महिने राहिले आहेत. न्यायालयाने शिंदे-फडणवीसांना उघडं पाडलं आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकावर हल्लाबोल केला. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. तसेच राज्य […]

Sanjay Raut : राज्यातले 'सुलतान', 'डेप्युटी सुलतान' प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : राज्यातले 'सुलतान', 'डेप्युटी सुलतान' प्रचारात व्यस्त; राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut News : शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सरकारला जावंच लागणार आहे. या सरकारचे आता फक्त तीन महिने राहिले आहेत. न्यायालयाने शिंदे-फडणवीसांना उघडं पाडलं आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकावर हल्लाबोल केला. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. तसेच राज्य सरकावर घणाघाती टीका केली.

ते म्हणाले, फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. मग तुम्ही पेढे कसले वाटताय असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.  उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. आम्ही सत्ता सोडली. नंतर राजकारण झाले. त्यात आमचे काय चुकले. पण आताचे सरकार बेकायदेशीर आहे. न्यायालयानेही त्यांना बेकायदेशीर ठरवले आहे. सरकार बेकायदेशीर, अपात्र ठरवले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निकालात म्हटले आहे. म्हणजे आता अध्यक्षांना 90 दिवसांत त्यांना निर्णय घ्यावा लागेल. दाबादाबी चालणार नाही. निर्णय घेतला नाही तर त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ

सरकारचा अंत जवळ आला आहे. अधिकाऱ्यांनी सरकारचे आदेश पाळू नयेत. आदेश पाळले तर अडचणीत येताल. सर्व आदेश बेकायदेशीर आहेत. आमचा लढा अंतिम टप्प्यात आहे. या सरकारचे तीन महिने बाकी आहेत. या सरकारला जावच लागणार आहे. यात अडथळे आणले तर पंतप्रधान मोदी अडचणीत येतील, असे राऊत म्हणाले.

पटोले-पवार पाहून घेतील

काँग्रेस नेते नाना पटोले महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी आघाडीच्या कोणत्याच नेत्यांना विचारात न घेता राजीनामा दिला. त्यानंतर आम्ही जर नवा अध्यक्ष नेमला असता तर हा मुद्दा तेव्हाच निकाली निघून 16 आमदार अपात्र झाले असते, असे अजित पवार यांनी सांगितले होते. त्यावर राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले,  नाना पटोले आणि अजित पवार दोघेही मोठे नेते आहेत. ते पाहून घेतील. मी यावर बोलणार नाही.

Exit mobile version