Download App

Maharashtra Politics : ‘त्या’ याचिकांचं काय होणार? आज महत्वाची सुनावणी

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही यावर दोन्ही बाजूंनी मागील सुनावणी वेळी युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर आज पुढील कार्यवाही होऊन या याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही, यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यास शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला आहे. प्रत्येक आमदाराचं म्हणणं ऐकून घ्यावं असे या वकिलांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

ललित पाटीलचे कारनामे माहित असूनही त्याच्या हाताला शिवबंधन…; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप

या प्रकरणात आज दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे. याआधी 13 ऑक्टोबरला सुनावणी झाली होती. त्यावेळी दोन्ही गटांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता पुढील कार्यवाही होणार आहे.

पक्ष अन् चिन्हाची सुनावणी मात्र लांबली 

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह (Maharashtra Politics) बंड करत वेगळी वाट धरली. त्यांच्या या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. या प्रकरणात निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होऊन पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 31 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार होती. आता मात्र दिवाळीनंतरच सुनावणी होईल अशी शक्यता आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Tags

follow us