Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह (Maharashtra Politics) बंड करत वेगळी वाट धरली. त्यांच्या या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. या प्रकरणात निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होऊन पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 31 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार होती. आता मात्र दिवाळीनंतरच सुनावणी होईल अशी शक्यता आहे.

Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

याआधी ठाकरे गटाच्या याचिकेवर 18 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल असे सांगितले होते. विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीती विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. त्यानुसार आयोगाने हा निकाल दिला होता. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76 टक्के मते शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना तर 23.5 टक्के मते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली. त्यामुळे मते आणि विधीमंडळातील आमदारांची संख्या पाहता पक्ष आणि चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे, असे निवडणूक आयोगाने निकाल देताना म्हटले होते.

आयोगाने दिलेल्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने थेट सप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून पुढील सुनावणी 31 ऑक्टोबरला होणार होती. पण, आता पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. आता ही सुनावणी कधी सुरू होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loksabha : भाजपच्या योजनांना शिंदेंचा सुरुंग; 22 जागांवर दावा केल्याने अजितदादांनाही टेन्शन

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच 17 ऑक्टोबरपर्यंत त्यांना नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभुमीवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार, विधानसभा अध्यक्ष नवीन वेळापत्रक सादर करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube