ललित पाटीलचे कारनामे माहित असूनही त्याच्या हाताला शिवबंधन…; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
ललित पाटीलचे कारनामे माहित असूनही त्याच्या हाताला शिवबंधन…; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप

Sanjay Gaikwad on uddhav thackeray : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे. यात राज्याचे अनेक मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर खासदार संजय राऊत यांनी हिंमत असेल तर याप्रकरणातील मंत्र्याचे राजीनामे घ्या, असं चॅलेंज केलं होतं. दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खळबळजनक विधान केलं.

World Cup 2023 : भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय; कोहलीने वनडेमधील 48 वे शतक ठोकले 

सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांना ललित पाटील प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. भुसेंच्या मदतीमुळेच ललित पाटील ससून रुग्णालयात होता, असा आरोप त्यांनी केला होता. तर ललित पाटीलला अटक केल्यांतर गृहमंत्री फडणवीस यांनी आता कोणालाही सोडणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर उबाठाकडून सरकारमधील मंत्र्यांना लक्ष केल्या गेलं. या सगळ्या घडामोडीनंतर आता गायकवाड यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, राज्यभरात ड्रग्जची तस्करी करणारा ड्रग्ज माफिया ललित पाटील हा अलीकडच्या काळात जन्माला आलेला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ललित पाटील मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी करायचा. हे माहित असतांनाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाटीलच्या हातावर शिवबंधन बांधले, असा खळबळजनक आरोप गायकवाड यांनी केला.

ते  म्हणाले की, ललित पाटील काय करतो, हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना चांगल्या पध्दतीने माहीत होतं. ललित पाटील ड्रग्जच्या दुनियेत काल-आज जन्माला आला नाही. तो अंमली पदार्थांच्या तस्करीतील जुना आणि मुरलेला खेळाडू आहेत. त्याच्या कारनाम्याबद्दल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना माहिती होती, ही माहिती असतानाही संजय राऊत यांच्या उद्धव साहेबांनी ललिताच्या हाताला शिवबंधन का बांधले, असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या लोकांनी कोणावरही आरोप करताना वस्तुस्थिती आणि आपण काय केले होते, याचे स्मरण ठेवावे. जे लोक काचेच्या घरात राहताता त्यांनी दुसऱ्यांची घरावर दगड मारण्याची हिंमत करू नये, असा घणाघातही गायकवाड यांनी केला होता.

ते म्हणाले की, ललित पाटील याने त्याला मदत करणाऱ्यांची नावं घेण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांची गोची होणार आहे. पोलीस यंत्रणेने त्याला शोधून काढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावला जाईल. पण ज्यांनी ड्रग्ज माफियाच्या हाती शिवबंधन बांधतांना मागेपुढे पाहिले नाही, त्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवतांना त्यातील तीन बोटं आपल्याकडे असतात हे विसरता कामा नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, या प्रकरणात पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube