ठाकरे गटाला दणका! आमदार अपात्रतेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस नकार

Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,कोर्टाकडून ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. धनुष्यबाण आणि पक्ष संदर्भात निवडणूक […]

Shiv sena Eknath Shinde camp want to join Thackeray group again after Ajit Pawar join Shinde Government

(Shiv sena Eknath Shinde camp want to join Thackeray group again after Ajit Pawar join Shinde Government)

Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,कोर्टाकडून ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

धनुष्यबाण आणि पक्ष संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणी लांबणीवर. जम्मू कश्मीर संदर्भातचे कलम 370 चे प्रकरण घटनापीठाकडे आहे. या प्रकरणानंतर सुनावणी होणार. अपात्र आमदारांच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी नाही. पुढील तारीख दिली जाईल. त्यानंतर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाला दणका! आमदार अपात्रतेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस नकार

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि शिवसेना पक्ष चिन्हाबाबत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्य अपात्रतेचा विषयावर निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांना द्यावेत अशी विनंती केली होती. मात्र, कोर्टाने ठाकरे गटाला दिलासा देण्यास नकार दिला.

आजच्या कामकाजात या मुद्द्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. तसेच या मुद्द्यावर तत्काळ सुनावणी घेण्यासही कोर्टाने नकार दिला आहे. यावर आता कधी सुनावणी होईल याची निश्चित तारीखही देण्यात आली नाही. त्यामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी कायम आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी अपात्रतेसाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता हा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणखी लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाल आहे.

Exit mobile version