Download App

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर वाढणार हालचाली

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) लवकरच निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आणखी एक महत्वाची बातमी आली आहे. सर्वौच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच माहिती आहे. न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या खटल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार त्यावर राज्य सरकारचेड भवितव्य अवलंबून राहणार आहे. या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगण्यात येत आहे.

Fadnavis Vs Thackeray : ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ राऊतांनी सांगितला, पण खरा अर्थ काय?

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने तत्काळ निकाल न देता राखून ठेवला आहे. आता येत्या 10 दिवसात न्यायालय निकाल देईल असे सांगण्यात येत आहे. हा निकाल येत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही केला जात नव्हता.

शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून दीर्घकालीन युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे कारण, या निकालावरच राज्य सरकारचेही भवितव्य अवलंबून आहे. या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे आता सांगण्यात येत आहे.

Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देत युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठविण्याबाबत निर्णय राखून ठेवण्यात आल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले होते. त्यानंतर आता हा  निकाल लवकरच येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तसेच शिंदे गटाकडून अॅड. हरिश साळवे यांच्यानंतर अॅड. निरज किशन कौल आणि अॅड. महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

 

Tags

follow us