”100 हून अनेकदा फोटो दाखवला; आता नव्या CM चं नाव काय सांगायचं?”

मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवसांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. तर, दुसरीकडे नव्या मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक विधान करत नवा मुख्यमंत्री कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही असे म्हटले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sudhir […]

Letsupp Image   2024 12 02T142053.523

Letsupp Image 2024 12 02T142053.523

मुंबई : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन नऊ दिवसांचा कार्यकाळ उलटून गेला आहे. तर, दुसरीकडे नव्या मुख्यमंत्री कोण याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. या सर्व घडामोडींमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सूचक विधान करत नवा मुख्यमंत्री कोण? हे नव्याने सांगायची गरज नाही असे म्हटले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Sudhir Mungantiwar On Maharashtra CM Name)

…अखेर श्रीकांत शिंदेंनीच पडदा उघडत सस्पेंन्स संपवला; आता लक्ष नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाकडं

मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार याचा चेहरा 100 हून अनेकदा दाखवण्यात आला आहे. यावरून कोण मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार याचा अंदाज बांधता येऊ शकतो असे ते म्हणाले. काही निर्णय घ्यायचे असतात काही औपचारिकता असतात हे सर्व निर्णय केंद्राच्या शिर्सस्थ नेत्यांकडून होणार आहे. त्यात अनेकादा वृत्तवाहिन्यांनी नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा फोटो दाखवला आहे. त्यामुळे मला वेगळं नव्याने काही सांगण्याची गरज नाही असे मुनगंटीवार म्हणाले.

आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाहीत का?; शिंदेंच्या भेटीला गेलेल्या शिवतारेंचा संताप

‘हा’ पॉलिटिकल अल्झायमर 

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या विधानाचाही समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाचे नाव आणि शपथविधीला होणारी दिरंगाई ही महायुतीच्या एकमेकांमध्ये अडकलेल्या तंगड्यामुळे असल्याचे म्हटले आहे. यावर मुनगंटीवार यांनी राऊतांचे हे विधान पॉलिटिकल अल्झायमर असल्याचे म्हटले आहे. 2004 मध्ये 15 दिवसांनी, 2009 मध्ये 14 दिवासांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. तर, 2019 मध्ये तर, विचारताच सोय नाही असे म्हणत तेलंगणा घ्या, कर्नाटक बघा सगळीकडे शपथविधी घ्यायला उशीर हा होतोच. यामागे काही अडकलं आहे म्हणून नाही तर,  उत्तमातील उत्तम निर्णय घेता यावा यासाठी हा उशीर आहे. आताही आमचे सरकार आहे आणि पुढेही आमचेच सरकार आहे त्यामुळे घाई करण्यात काहीच अर्थ नाही.

विजय रूपाणी अन् निर्मला सीतारामन निवडणार महाराष्ट्राचा नवा CM

मागणी आणि हट्ट दोन्ही वेगवेगळे 

मुख्यमंत्री भाजपला देण्यात आल्यास गृहमंत्री आणि महसूल खातं शिवसेनेला मिळावं अशी शिवसेनेची मागणी आहे. यावर मुनगंटीवार म्हणाले की, मागणी आणि हट्ट या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. इच्छा व्यक्त करण्यात काहीच हरकत नाही. मात्र, तर्काच्या आधारावार वाटप होणे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे. अमित शाह यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून ते जे सांगतील त्या निर्णयामागे आम्ही खंबीरपण उभे आहोत असे मला शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

Exit mobile version