Download App

Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबली

Maharashtra Politics : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची (Maharashtra Politics) डोकेदुखी वाढविणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्याबरोबरचे 16 आमदार पात्र होणार की अपात्र याचा निर्णय आणखी लांबणीवर गेला आहे. कारण, आता या प्रकरणाची (MLA Disqualification Case) सुनावणी आणखी महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी 3 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे.

‘…तर आम्ही कंत्राटी कामगारांना पर्मनंट करणार’; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे मात्र, कोर्टाकडून त्यांना जोरदार झटका बसला आहे. कोर्टाने पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षातून बाहेर पडले होते. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर ठाकरे गटाने कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. यानंतर कोर्टाने अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता.

या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून चालढकल केली  जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टानेही विधानसभ अध्यक्षांना फटकारलं होतं आणि या प्रकरणात पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होईल असे स्पष्ट केले होते. त्यानंतरही 6 ऑक्टोबर पुढे 9 ऑक्टोबर अशा तारखा देण्यात आल्या होत्या. आता तर थेट एक महिनाच सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला सुनावणीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; ‘त्या’ ट्विटवर अण्णा हजारे आक्रमक

Tags

follow us