आव्हाडांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार; ‘त्या’ ट्विटवर अण्णा हजारे आक्रमक
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. त्याला कारणही तसेच आहे. आज सकाळी आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर जोरदार टीका केली. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली होती. आता अण्णा हजारेंनी त्यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं. आव्हाड यांनी आपली बदनामी केल्याप्रकरणी आव्हाड यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा (defamation) दावा दाखल करणार असल्याचं हजारेंनी सांगितलं.
‘…तर आम्ही कंत्राटी कामगारांना पर्मनंट करणार’; प्रकाश आंबेडकरांची घोषणा
काँग्रेस सरकारविरोधात रामलीला मैदानावर ऐतिहासिक आंदोलन करणाऱ्या अण्णांनी देशात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून एकही आंदोलन केलेले नाही. अण्णा हजारे यांची काय मजबुरी आहे की ते काँग्रेसचे सरकार आल्यावरच आंदोलन करतात? भाजपचे सरकार आल्यावर ते मौनव्रत का धारण करतात, असे सवाल लोक विचारत असतात. हाच धागा पकडून आव्हाड यांनी अण्णआ हजारे यांना सवला करणारी एक पोस्ट एक्सवर लिहिली.
अण्णा हजार यांचा फोटो शेअर करत आव्हाड यांनी टीका केली. त्यांनी लिहिलं की, या माणसानं देशाचं वाटोळं केलं. टोपी घातली म्हणजे, कुणी गांधी होत नाही, अशी पोस्ट त्यांनी लिहिली. याला उत्तर देतांना अण्णा हजारे म्हणाल की, माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं नाही, मी जे कायदे केले त्यानं देशातील नागरिकांचं भले झाले. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. एक झालं की, माझ्या काही आंदोलनामुळं यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले, हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी. यावर वकिलांशी चर्चा करून आव्हाड यांच्याविरुध्द अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अण्णा हजारे यांनी युती सरकारच्या काळात राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्दावर आंदोलन केलं. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संघटनेने काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात निदर्शने केली. त्यांना दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सर्व काँग्रेसविरोधी सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला होता. अनेक मंत्र्यांना तुरुंगातही जावं लागलं.
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर अण्णांनी लोकपालच्या मुद्द्यावर अनेक दिवस सुरू असलेले आंदोलन मागे घेतले होतं. राष्ट्रपिता महात्मा गांधीनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आता अण्णा हजारे हे देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करतील, असं जनेला वाटू लागलं. मात्र भाजप सरकारला सत्तेत येऊन 10 वर्षे झाली, मात्र त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात एकही आंदोलन न केल्यानं सोशल मीडियावर नेटकरी त्यांना सवाल विचारताहेत.