Devendra Fadnavis on Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) अचानक नॉट रिचेबल झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तसे काही घडले नाही. खुद्द अजित पवार यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले होते. मात्र, त्यांच्या या अचानक नॉट रिचेबल होण्यामागे त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी गेल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते ? याबाबत भाष्य केले आहे.
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात त्यांना तुमचे आणि अजित पवार यांचं राजकीय नातं कसं आहे ? याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा फडणवीस म्हणाले, ‘समजा ते सरकार आमचं 72 तासांचं होतं.. ते गेल्यानंतर अजित पवार इतके डिफेन्सिव होते की मला भेटत देखील नव्हते. त्यानंतर कोविड उपाययोजनांसदर्भात आमची फक्त दोन वेळा भेट झाली होती. लोकांच्या मनात सुद्धा याबाबत मोठे संभ्रम निर्माण झाले होते.’
‘आता अजितदादा पुण्यातील कोणत्या तरी कार्यक्रमातून निघून गेले. त्या दिवशी माझा फाईल डे होता. म्हणजे त्या दिवशी दुसरे कोणतेही कार्यक्रम न घेता सगळ्या फाइल्स काढतो. एक सकाळचा कार्यक्रम माझ्या टाइमलाइवर होता त्यानंतर दिवसभर बसून सगळ्या फाइल्स क्लिअर करायच्या होत्या. त्यामुळे माझ्या टाइमलाइनवर कार्यक्रम दिसत नव्हता. तर लोकांना असं वाटायला लागलं की अरे परत काही सुरू झालं की म्हणजे लगेच चर्चा सुरू. आणि त्या कुठपर्यंत पोहोचतात. बरं झालं त्यादिवशी मी पत्रकारांना गप्पा मारण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे ते सगळे माझ्याच घरी होते. दुसरीकडे चर्चा कुठपर्यंत पोहोचल्या तर अजित पवार आणि फडणवीस नागपुरात भेटले. म्हणजे मुंबईत ते कुठे होते, हे सुद्धा मला माहिती नव्हतं.’
हे खरच आहे
हे खरंच आहे की शेवटच्या काळात शिंदेंबरोबर चर्चा झाली. ते तुम्हाला कळलं नाही. पण चर्चा तुम्हाला कळली असती तर ते झालं असतं का ?, मग अशा गोष्टी तुम्हाला कशा सांगू आम्ही ? कशाला तुम्हाला कळवू ? असे स्पष्ट करत फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.