Download App

राज्य सरकारच्या पाठिशी दिल्लीतील महाशक्ती; मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी स्पष्टच सांगितले..

पुणे – ‘राज्यात आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सरकार आहे. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आशिर्वाद तर अमित शहा (Amit Shah) यांचे मार्गदर्शन मिळत आहे. राज्य सरकार तुमच्यासोबत आहे, त्यामुळे आता काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे (Pune) येथे शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात सध्या अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमागे दिल्लीतील महाशक्ती असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. त्यातच आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात राज्य सरकारला पंतप्रधान मोदींचे आशिर्वाद आणि अमित शहा यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदेंच्या ट्विटरमध्ये मोठा बदल

शिंदे पुढे म्हणाले, की ‘राज्यात आता सामान्य नागरिकांचे सरकार आहे. त्यांच्याचसाठी हे सरकार काम करत आहे. राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत.शिवसृष्टी सुरू करण्याचा विचार बाबासाहेब पुरंदरे यांचा होता. आज या शिवसृष्टीचा एक टप्पा पूर्ण होत आहे, याचा आनंद आहे. राज्य सरकारनेही यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसृष्टीसाठी काहीच कमी पडू दिले जाणार नाही याचा शब्द देतो. कारण हा उपक्रम आपल्या सगळ्यांचा आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्हही धोक्यात आले आहे. या घडामोडींमुळे विरोधक विशेष करून ठाकरे गट कमालीचा आक्रमक आहे. राज्यात आतापर्यंत ज्या घटना घडल्या आहेत घडत आहेत. त्यामागे दिल्लीतील शक्ती असल्याचा आरोप विरोध पक्षातील नेत्यांनी अनेकदा केला आहे. त्यांच्याकडून हे प्रकार घडविले जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता  मुख्यमंत्र्यांनीही राज्यातील सरकारला मोदी-शहा यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे म्हटले आहे.

Tags

follow us