Maharashtra Rain Alert : अहिल्यानगर, रत्नागिरी, सांगलीसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट; धो धो पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र तरी देखील राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी होत असलेल्या

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र तरी देखील राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे आता महाराष्ट्रासाठी भारतीय हवामान विभागाने नवीन अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानूसार राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोंथा चक्रीवादळानंतर आणखी एक चक्रीवादळ येणार असल्याने राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचा अंदाज (IMD Alert) भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकते. त्यामुळे 8 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अहिल्यानगर, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि सातारा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

Clove Benefits : बदलत्या ऋतूंमध्ये लवंग ‘या’ 5 आजारांपासून करणार संरक्षण ; जाणून घ्या वापर

तर बीड, नांदेड, सोलापूर, रायगड, मुंबई, धाराशिव आणि कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात वादळ येण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, 18 जिल्ह्यांमधील 121 जागांवर कोण मारणार बाजी?

Exit mobile version