Maharashtra Rain Alert : राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईसह, पालघर सारख्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आज 7 जुलै रोजी प्रशासनाने 6 जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने पालघर, नाशिक आणि पुणेसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अर्लट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 7 जुलै रोजी नाशिक, पालघर, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, भिवंडी आणि कल्याण- डोंबिवलीच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून (Maharashtra Rain Alert) आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व शाळा तसेच महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस असणार खास, होणार फायदा; जाणून घ्या सर्वकाही
तर दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नाशिकसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. नाशिक शहरात आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, नाशिकमध्ये यंदा गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
