Maharashtra Rain Alert : संपूर्ण राज्यात मान्सूनची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसाची वाटचाल संथ सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्यासाठी वातावरण तयार झाल्याने आज राज्यातील अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर, गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे तर अकोला, भंडारा, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात देखील वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या जिल्ह्यांसाठी देखील येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. याचबरोबर हवामान विभागाने (IMD) मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
या जिल्ह्यांमध्ये आज विजांसह वादळी पावसाचा अंदाज येलो अलर्ट जारी
हवामान विभागाने आज संभाजीनगर, मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडार, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
