Maharashtra Rain : अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे अन् नाशिक घाट परिसरासाठी आज रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून आज पुणे अन् नाशिक घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलायं.

Untitle (5)

Untitle (5)

Maharashtra Rain : राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस सुरु असून 31 जुलै ते 27 ऑगस्टपर्यंत म्हणजेच पुढील चार आठवड्यांसाठी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानूसार पुढील 24 ते 48 तासांत राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

196 देश अन् फिजी; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंड राहुल कोळोखे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

31 जुलै रोजी पुण्यातील घाट परिसर, नाशिकच्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील काळात पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, बीड परभणी हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जून महिन्यात पाऊस कमी झाला. जवळपास जून महिना कोरडा गेला. पण जुलै महिन्यात त्याची पूर्ण भरपाई भरून निघाली. नांदेड शहरासह काही भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. हा पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे.

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीबाबत लवकरच बैठक… आमदार जगतापांची माहिती

दरम्यान, ऑगस्ट महिन्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या ओढ देण्याच्या शक्यतेमागे तीन मुख्य कारणे समोर येत आहेत. देशात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत सुमारे १५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ‘अल निनो’ स्थिती कशी राहते, यावरच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे प्रमाण घटल्यास खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे बळीराजाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version