जिल्हा सहकारी बँक निवडणुकीबाबत लवकरच बैठक… आमदार जगतापांची माहिती
धावत्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्हा बँक निवडणुकीवर भाष्य केल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
Meeting regarding District Cooperative Bank elections soon : जिल्हा सहकारी बँकेची निवडणुकीच्या पार्शवभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये राजकीय भेटीगाठींना वेग आला आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या भेटीगाठी सुरु आहे, यातच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नगर शहरात आल्या होत्या. यावेळी झालेल्या धावत्या आढावा बैठकीत त्यांनी या जिल्हा बँक निवडणुकीवर भाष्य केल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. जिल्हा सहकारी बँक निवडणुकीबाबत लवकरच बैठक घेणार असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बीडकडे जात असताना त्यांनी अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृह येथे काहीकाळ थांबल्या. यावेळी त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. यावर बोलताना जगताप म्हणाले, शहरातील विकासकामांची माहिती घेतली तसेच या धावत्या भेटीदरम्यान त्यांनी जिल्यातील विकासकामांचा देखील आढावा त्यांनी घेतला.
मोठी बातमी : महिलांसाठी आरक्षित असलेले सरपंचपद पुढील कार्यकाळात सर्वसाधारण; न्यायालयाचा सरकारला झटका
शहरातील समस्या असतील तसेच विकासकामे असतील याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे देखील आश्वसन यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिल्याची माहिती जगताप यांनी दिली . तसेच जगताप म्हणाले, जिल्हा सहकारी बँक निवडणुकीबाबत देखील यावेळी पवार यांच्याशी चर्चा झाली. जगताप म्हणाले, जिल्हा सहकारी निवडणुकीबाबत देखील लवकरच बैठक ही आयोजित केली जाणार आहे.