Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा पाऊस लांबणीवर, पुढील 2 दिवसांत..,

राज्यात मान्सून लांबणीवर पडला असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलीयं.

rain update

rain update

Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा पाऊस लांबणीवर (Maharashtra Rain Update) पडला असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोसमी पावसाने वाटचाल केलीय. मात्र, दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनच्या पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मान्सूनचा पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झालीयं. त्यामुळे राज्यात मान्सून लांबणीवर पडल्याचं सांगितलं जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.

महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून कारवाई; प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीचे समन्स

मॉन्सून 6 जून रोजी तळकोकणात दाखल झाला असून सध्या मॉन्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमधील काही भागात स्थिर आहे. मॉन्सूनची राज्यातील वाटचाल काहीशी संथगतीने सुरु असून पुढील काही दिवस नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातही पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवत असून शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदलाकडून ‘भीम’ रणगाडा भेट; राळेगणसिद्धीत दाखल होताच अण्णा भावुक

मुंबई शहरात अद्याप पावसाची इंट्री झाली नाहीये. प्रचंड ऊकाडा आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. आज उपनगरांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 12 आणि 13 जून रोजी उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. काही भागात उष्णता राहण्याचीही शक्यता आहे. राज्यात अजूनही अपेक्षित मॉन्सून दाखल झाला नाही. अवकाळी पाऊस थोड्याबहुत प्रमाणात कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने 15 राज्यांमध्ये पुढील 10 तासांकरिता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला.

Exit mobile version