Download App

Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार

Maharashtra Rain : पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पणजीपासून 110 किलोमीटरवर तर रत्नागिरीपासून (Ratnagiri)130 किलोमीटर अंतरावर आहे. ते पूर्व इशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. आणि आज (दि.30) रात्री पणजी ते रत्नागिरी दरम्यान कोकण, गोवा किनारपट्टीवर क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासांमध्ये कोकण, गोव्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञ शिल्पा आपटे(Shilpa Apte) वर्तवली आहे. तसेच पुण्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

‘किस्से वर्ल्डकप’चे वर्ष 1983! सेलिब्रेशनसाठी उधारीची शॅम्पेन अन् उपाशी खेळाडू…

हवामान शास्त्रज्ञ शिल्पा आपटे यांनी सांगितले की, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

2000 च्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत बदलता येणार नोटा

समुद्रातील तीव्र कमी दाबाचा पट्टा जमीनीवर आल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल. साधारण 4 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील चार हवामान विभागांचा अंदाज :
आज कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त आहे.

पुढील 48 तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी व शिंधुदुर्ग जिल्ह्यात तर उद्या शिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना आज शनिवारी (दि.30) आणि उद्या रविवारी (दि.01) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 48 तासांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरनंतर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील हवामान अंदाज
आज पुणे जिल्ह्यात आकाश ढगाळ होऊन मेघर्गजना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या (दि.1)आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोमवारी (दि.2) आकाश ढगाळ राहून अतिहलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 3 ऑक्टोबरनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञ शिल्पा धोपटे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज