2000 च्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत बदलता येणार नोटा

  • Written By: Published:
2000 च्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयकडून मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत बदलता येणार नोटा

2000 Rupies note : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) मे महिन्यात दोन हजारांच्या नोटा (Two thousand notes) चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. या नोटा बॅंकाध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापही लोकांनी नोटा बदलून न घेलत्यानं आता आरबीआयनं नोटा बदलून घेण्यासाठी आणखी एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी निवेदन जारी करत दोन हजार रुपयांचा नोट चलनातून मागे घेतली होती. तेव्हा आरबीआयने नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर तारीख दिली होती. आरबीआयने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या अपडेटनुसार 2000 रुपयांच्या 93 टक्के नोटा परत आल्या आहेत. मात्र, अजूनही सात टक्के नोटा अर्थात 25 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या नाहीत. दरम्यान, आता आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ दिली आहे.

“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार 

एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट करत याबाबतचे वृत्त दिलं. त्यात स्पष्टपणे लिहिलं की, आता 7 ऑक्टोंबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा करता येणार आहेत. दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची ही अंतिम तारीख आहे. अशा परिस्थितीत जरा तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर त्या बदलून घ्या, असं आवाहनही आरबीआयने केलं.

दरम्यान, 7 ऑक्टोबरनंतर 2000 रुपयांच्या नोटीची किंत कागदाच्या तुकड्यासाऱखी होईल.

अशा प्रकारे 2000 रुपयांची नोट बदला

आरबीआयने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, बॅंकामध्ये नोटा बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारचाी कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. त्यामुळं जर तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर तुम्ही बँकेत जमा करू शकता. तुम्ही दररोज फक्त 20 हजार रुपये जमा करू शकता. बँकांकडून 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया 23 मे पासून सुरू झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube