Maharashtra Rain Alert : पुन्हा मुसळधार पाऊस; तब्बल 20 जिल्ह्यांना ऑरेंज अन् यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे 27 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 27 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने 20 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक (Nashik Rain Alert) , सातारा,  पालघर (Palghar Rain Alert) आणि ठाणे जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामानविभागानुसार, आज या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई (Mumbai Rain Alert) , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. याच बरोबर नंदुरबार, नाशिक, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

अखेर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांनंतर उपोषण मागे; सरकारकडून 3 अटी मान्य-

तर दुसरीकडे 25 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 26 आणि 27 पावसाची शक्यता नसल्याने अनेक जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version