Download App

ऑगस्ट रुसला, सप्टेंबरमध्ये पाऊस होणार का? हवामान खात्यानं दिलं उत्तर

Maharashtra Rain : मागील दोन ते आठवड्यांपासून पावसाने सगळ्या राज्यातच दडी (maharashtra Rain) मारली आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिन्यात कुठेच पाऊस झाला नाही. आता हा महिना दोन दिवसांनी संपेल. त्यानंतर सप्टेंपबर महिन्यात तरी पाऊस होईल का असा प्रश्न विचारला जात असतानाच हवामान खात्याने पावसाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात फारसा पाऊस पडेल याची शक्यता दिसत नाही. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस (Maharashtra Rain) हजेरी लावणार आहे. पुढील तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत असा अंदाज हवामान विभाागाने दिला आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता आहे. या पावसाने फारसा काही फरक पडेल अशी शक्यता दिसत नाही. यामुळे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती हे जिल्हे कोरड्या दुष्काळाच्या दृष्टीकोनातून रेड झोनमध्ये आले आहेत.

महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती चिंताजनक; जालना, सांगली, साताऱ्याला सर्वाधिक फटका

निम्मा विदर्भ दुष्काळाच्या छायेत, हे जिल्हे रेड झोनमध्ये

यंदा राज्यात मान्सूनने उशीरा एन्ट्री घेतली. तरी देखील सुरुवातीच्या दिवसात जोरदार पाऊस पडला. जुलै महिन्यात संपूर्ण विदर्भात 43 टक्के अतिरिक्त पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने ब्रेक घेतला. ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेला. त्यामुळे विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांतील पर्जन्यमानात अनुक्रमे 32,29 आणि 22 टक्क्यांची तूट आली. वाशिम आणि गोंदिया येथे अनुक्रमे 16 व 17 टक्क्यांची तूट निर्माण झाली. राज्यातील अन्य जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम संकटात सापडला आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मुंबईत पावसाची हजेरी

आता अरबी समु्द्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईत मागील दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत पाऊस बरसला. ढगाळ हवामान असल्याने मंगळवारी दिवसभर मुंबईत पाऊस होईल असा अंदाज आहे. एकूणच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा हवीच, टंचाई आढावा बैठकीत विखेंचे आदेश

Tags

follow us