Download App

Rain Alert : आठवडाभर राज्यात रिमझिम पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

  • Written By: Last Updated:

Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून थैमान घालत असलेला पाऊस आता कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होईल, परंतु राज्यभर रिमझिम पाऊस सुरूच राहील. मुबईच्या नागरिकांना तरी तूर्तास पावसापासून सुटका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस पावसाची विश्रांतीच राहिल. पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदूरबार, पुणे, साताऱ्यातील घाट भागात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. (maharashtra rain update reduction in rainfall activity expected next one Week)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तसे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. या भागात आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे दिसते. राज्यात काही ठराविक जिल्ह्यांतच जोरदार पाऊस झाला. अन्य ठिकाणी जुलै महिना संपला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पेरण्याही संकटात सापडल्या आहेत.

Manipur Violence : मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी

विदर्भात अनेक ठिकाणी आता पर्यंत 500.8 मिमी पाऊस झाला आहे. या काळात 450 मिमी पावसाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, अपेक्षेपेक्षा सरासरी 11.5 टक्के जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये यवतमाळ 37 तर भंडारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 28 टक्के जास्त पाऊस झाला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Tags

follow us