Raj Thackeray : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची बुधवारी जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच आज पक्षाची जी अवस्था झाली आहे ती होण्यामागे कोणते राजकारण जबाबदार होते हे ही सांगितले. राज ठाकरे म्हणाले, तुम्हाला फक्त महाबळेश्वरचा तेवढा एकच प्रसंग माहिती आहे. पण त्याआधी काय घडले हे सुद्धा सांगितले पाहिजे. ते सांगण्यासाठीच आज मी येथे आलो आहे. हा प्रसंग तुम्हाला कळला की तुमच्याही लक्षात येईल की आज जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती कशामुळे आली.
हे ही वाचा : शिवधनुष्य बाळासाहेबांनाच पेलवले, एकाला तर झेपलेच नाही; चिन्हाच्या वादावर राज ठाकरे बोलले..
राज ठाकरे म्हणाले, मी एक दिवस उद्धव यांना कारमध्ये बसवून घेऊन गेलो. एका हॉटेलात आम्ही आलो. त्यावेळी मी उद्धवना माझ्यासमोर बसवले. त्यांना स्पष्ट सांगितले. तुला पक्षाचे अध्यक्ष व्हायचे खुशाल हो. भविष्यात शिवसेनेची सत्ता आल्यावर तुला जर मुख्यमंत्री व्हायचे असेल तरी हो, तुला जे व्हायचे असेल ते हो मला काहीच अडचण नाही. मला फक्त इतकेच सांग की माझे काय काम आहे ?, मला फक्त प्रचारापुरते तुम्ही ठेऊ नका.
प्रचार माझ्याकडून करवून घेणार उद्या तुम्ही आश्वासने पूर्ण केली नाही तर मी लोकांना काय सांगणार, निवडणुकांनंतर जी जबाबदारी घ्यायची आहे ती कोण घेणार, असे प्रश्न विचारले.
नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण, बाळासाहेबांनी..; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग !
आमच्यातील काय अडचणी होत्या ते सगळे स्पष्ट केले. घरी येऊन बाळासाहेबांना सांगितले. त्यांनाही या गोष्टीचा खूप आनंद झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. पण, त्यानंतर पुढे मात्र उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर बाळासाहेबांनी मला उद्धवना बोलावण्यास सांगितले होते पण ते कुठेतरी निघून गेले असेही त्यांनी सांगितले.