Sanjay Raut On Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतने खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लगेच एक गजब मागणी केली आहे. तीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या सूटची (खोली) मागणी केली. कंगना रणौतच्या या अजब मागणीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, यावर आता ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी कंगनाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
त्या त्या भवनात राहा Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
खरं म्हणजे त्या इतक्या मोठ्या आहेत की, त्यांना राष्ट्रपती भवनातील मोठ्या सूटमध्ये ठेवायला हवं असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. तसंच, एक नियम आहे नवीन खासदार जेव्हा निवडून दिल्लीत जातात आम्हीही गेलो तेव्हा ते ज्या राज्यातून निवडून जातात त्या राज्याच्या दिल्लीतल्या त्या वास्तू आहेत, सदन आहेत, बिहार सदन असेल, उत्तर प्रदेश भवन असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र सदन असेल, गुजरात भवन असेल त्यामध्ये त्या खासदाराची व्यवस्था केली जाते. त्या खासदाराला कायमस्वरूपी निवासस्थान मिळेपर्यंत तिथे व्यवस्था केली जाते अशी माहिती राऊतांनी यावेळी दिली.
आमचे खासदार सिंगल रूममध्ये
मिळाली कंगना रनौतची मागणी म्हणजे मोठा विनोद असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. ‘आजही आपल्या राज्याचे खासदार जे निवडून गेले आहेत. मी कालच चौकशी केली आमच्या खासदारांची. ते महाराष्ट्र सदनमध्ये आहेत आणि त्यांना एक सिंगल रूम मिळाली आहे राहण्यासाठी. ते आपली व्यवस्था करतात तिथे. आता या कंगना राणावत नावाच्या ज्या श्रीमती आहेत त्यांनी महाराष्ट्र सदन आणि मुख्यमंत्र्यांचा सूट मागावा हा फार मोठा विनोद आहे. त्या हिमाचल प्रदेशमधून निवडून आल्या आहेत. त्यांची व्यवस्था हिमाचल सदनमध्ये कायद्यानुसार व्हायला हवी, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
राष्ट्रपती भवनातील स्पेशल सूट द्या आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज
त्याचबरोबर हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असेल की कंगना रनौतला मुख्यमंत्र्यांचा सुट द्यावा तर आमची काही हरकत नाही. मग आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक सीनियर खासदार आहेत, जॉईंट किलर आहेत मग त्यांना द्या मुख्यमंत्र्यांचा सूट. अशा मागण्या करणं हा मूर्खपणा आहे. असू द्या त्या कंगना रनौत आहेत. त्या उद्या पंतप्रधानांना देखील बोलू शकतात की मला पंतप्रधान निवासामध्ये ठेवा, राष्ट्रपती भवनातील स्पेशल सूट द्या. ऐवढी मोठी अभिनेत्री आहे ती असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.