आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज
First 18th Lok Sabha Session : लोकसभेच संसदीय अधिवेश सुरू असून नवनिर्वाचीत खासदारांना शपध दिली जात आहे. यामध्ये महाराष्ट्राती बहुतांश खासदारांनी शपथ घेतल्यानंतर वेगवेगळ्या घोषणा दिल्या आहेत. (Lok Sabha Session) यामध्ये जळगावच्या नवनिर्वाचीत खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेस खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र, जय शिवराय अशी घोषणात दिली. ( MP Oath) तसंच, अकोल्याचे खासदार संजय शामराव धोत्रे यांनी जय जवान जय किसान तर, वर्ध्याचे खासदार अमर शरदराव काळे यांनी जय शिवराय जय भीम अशी घोषणा दिली.
खासदारांनी सुचनेचं पालन केलं नाही
दरम्यान, हिंगोलीचे नवनिर्वाचीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथ घेताना स्व. बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या वडिलांचे नाव घेतल्याने त्यांना लोकसभा अध्यक्षांनी थांबवलं आणि जे लिहून दिलं आहे तेच वाचाव असा आग्रह केला. त्यानंतर आष्टीकर यांनी पुन्हा शपथ घेतली. यावेळी लोकसभा अध्यक्ष भर्त्रीहरी महताब यांनी यावेळी तुम्हाला जे लिहून देण्यात आलं आहे ते वाचा इतर घोषणा देऊ नका. त्या काही रेकॉर्डवर जाणार नाहीत अशी समज खासदारांना दिली. परंतु, महाराष्ट्रातील एकाही खासदाराने त्यांनी सांगितलेल्या सुचनेचं पालन केलं नाही.
संविधानाची प्रत हातात Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
यावेळी सुप्रिया सुळे यांनी शपथ घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्ष भर्त्रीहरी महताब यांचं दर्शन घेतलं. तसंच काहीवेळ संवादही साधला. तसंच, अमोल कोल्हे यांनीही अध्यक्षांचे दर्शन घेतले. दरम्यान, काँग्रेस आणि काही इंडिया आघाडीतील अनेक खासदारांनी हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली. तसंच, जय संविधानाच्या घोषणाही दिल्या. यावेळी राहुल गांधी विरोधी पक्षनेते बसतात त्या बाकावर बसले होते. त्यांच्या हातातही संविधानाची प्रत होती.