Sanjay Raut Criticized BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकात पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेबद्दल मोदींना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपबरोबर जाण्याची इच्छा होती असा दावा पवार यांनी पुस्तकात केला आहे.
Sharad Pawar यांची निवृत्तीची घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार
त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजपाची सत्तेसाठीची भूमिका कायम आहे. त्यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर युती केली होती. शिवसेना फोडून मिंधे गट जवळ घेतला. तर ते कोणालाही जवळ घेऊ शकतात. ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू असलेले दहा ते बारा लोक बरोबर घेतले तर ते कोणत्याही प्रकारचा राजकीय व्यभिचार करू शकतात, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपावर परिणाम होईल का, या प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले, मला तसं वाटत नाही. आत्ताच्या सुरू असलेल्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बाबी आहेत. शरद पवार हे जाणकार आहेत त्यामुळे ते राज्याच्या हिताचा निर्णय घेतील.
राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी
संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी कर्नाटकात येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी इथे येत आहेत, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी आम्हाला सांगण्यापेक्षा त्यांचा मित्र पक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होते की, तुम्ही इथे उमेदवार उभे करु नका. तुम्ही त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका, ते असे बोलत नाहीत. कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्याकरिता काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत इथे आले आहेत, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.