Download App

Maharashtra Bhushan Award : विक्रमी गर्दीच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी ‘महाराष्ट्र भूषण’

Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

मंत्री अमित शाहंचं सोहळ्याला येण्यामागचं खरं कारण काय?

 

काही दिवसांपूर्वी धर्माधिकारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची रेवदंडा येथे घरी जाऊन भेट घेतली होती.

दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्राच्या माध्यमातून समाज घडविण्याचे काम धर्माधितकारी अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यानंतर आज त्यांच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र सरकारने केला. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानितक करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आज खारघर येथील सेंट्रल मैदानावर प्रचंड गर्दी झाली होती. या लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य सरकारमधील विविध खात्यांचे मंत्रीही उपस्थित होते. यावेळी अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव केला.

 

Tags

follow us