मंत्री अमित शाहंचं सोहळ्याला येण्यामागचं खरं कारण काय?

मंत्री अमित शाहंचं सोहळ्याला येण्यामागचं खरं कारण काय?

Amit Shah Mumbai Tour : केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दोन दिवस मुंबई दौरा असून शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र, काल शाह मुंबईत येताच रात्रीच्या सुमारास त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचं समोर आलं.

दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल

अमित शहा यांनी काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावर भाजप नेत्यांची बैठक घेत मुंबई महाापालिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा आणि मार्गदर्शन केल्याची माहिती मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत अमित शहा यांनी मुंबईतील भाजपच्या नेत्यांकडून माहिती घेतली.

Pulwama attack : सत्यपाल मलिकांच्या आरोपावरुन काँग्रेस आक्रमक, ‘मोदींनी उत्तर द्यावं’

या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील गैरहजर राहिल्याचे दिसून आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत वक्तव्य केल्याने ते चर्चेत होते. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी अमित शहा चंद्रकांत पाटलांवर नाराज असल्याचं समजतंय. म्हणूनच चंद्रकांत पाटील बैठकील आले नसल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर

यावेळी अमित शहांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लोकसभा निवडणुकीत 45 जागा महाराष्ट्रातून निवडून आणण्याबाबतच्या रणनीतीविषयी चर्चा झाल्याच समोर आलंय. आज निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube