Download App

बैठक निष्फळ ठरली! ‘लाल’परीला अद्यापही ब्रेकच, उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक होणार

एसटी महामंडळ कृती समितीची मंत्री उदय सामंत यांच्यासोबतच बैठक पार पडली असून ही बैठक निष्फळ ठरलीयं. उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार आहे.

ST Strike : राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून (ST Strike) विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. एसटी बंद असल्यामुळे राज्यात सर्वच प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचं चित्र आहे. एसटी महामंडळ कृती समितीची मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याशी बैठक पार पडली. ही बैठकही निष्फळ ठरल्याचं समोर आलंय. या बैठकीनंतरही एसटी कृती समितीकडून आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचा पवित्रा घेतलायं. उद्या 4 सप्टेंबरला एसटी कृती समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक पार पडणार असून या बैठकीत तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi: घरातील कामांवरुन वर्षाताईंचा निक्कीवर रोख; जान्हवी अन् अभिजीतची होतेय चिडचिड

एसटी महामंडळाच्या संपाबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, एसटी महामंडळाच्या संपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली असून सरकार एसटी महामंडळावर अन्याय होऊ देणार नाही. विविध मागण्यांबाबत आचारसंहितेच्या आधीच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने 48 तासांचा अवधी द्यावा, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

चुकीला माफी नाही! चक्क केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर कारवाई; बिहारमध्ये काय घडलं?

एसटी महामंडळ कृती समितीची पुढील 48 तासांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन का केलं कळलं नाही. हे आंदोलन राजकीय आहे हे मी म्हणणार नाही. पण अशा परिस्थितीत आंदोलन केल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जाऊ शकतो, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

दोन सख्ख्या बहिणींनीच केला वनराज आंदेकराचा गेम; सुपारी देणाऱ्या मेहुणे अन् बहिणींना अटक

तोडग्याशिवाय संप मागे घेणारच नाही…
राष्ट्रपती महाराष्ट्रात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत तोडगा निघत नाही तोवर आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं समितीचे संदीप शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्यातील जनता गणरायाच्या आगमनाची तयारी करत असतानाच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासूस संप पुकारला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठीच हा संप सुरू करण्यात आला आहे. ऐन सण उत्सवाच्या काळातच संप पुकारण्यात आल्याने राज्यात अनेक ठिकाणी एसटी वाहतूक कोलमडली आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतून धावणाऱ्या बस आगारातच उभ्या आहेत. या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होऊ लागले आहेत.

follow us