Bigg Boss Marathi: घरातील कामांवरुन वर्षाताईंचा निक्कीवर रोख; जान्हवी अन् अभिजीतची होतेय चिडचिड

Bigg Boss Marathi: घरातील कामांवरुन वर्षाताईंचा निक्कीवर रोख; जान्हवी अन् अभिजीतची होतेय चिडचिड

Bigg Boss Marathi New Season Day 38: ‘बिग बॉस मराठी’च्या या ( Bigg Boss Marathi New Season) आठवड्याच्या कॅप्टन वर्षा ताई (Varsha Usgaonkar) आहेत. घरातील कामांची वाटप करणं आणि सदस्यांकडून ती कामं करुन घेणं हे कॅप्टनचं काम असतं. (Bigg Boss Marathi) पण वर्षा ताईंनी दिलेल्या ड्युटी पूर्ण करण्यास निक्कीने (Nikki) नकार दिला आहे. त्यामुळे घरात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. घरातील कामांवरुन वर्षाताईंचा निक्कीवर रोख आहे. तर दुसरीकडे निक्कीच्या वागणुकीमुळे जान्हवी (Janhvi) आणि अभिजीतचीदेखील चिडचिड होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


निक्कीने मनमानी करत घरातील कामं करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कॅप्टन असलेल्या वर्षा ताई याबद्दल वैभव, आर्या आणि अंकिताला सांगत आहेत. दरम्यान निक्की मात्र या सगळ्या गोष्टींची मजा घेताना दिसत आहे. वर्षा ताई म्हणत आहेत,”वैभवने मला निक्कीसोबत बोलायला सांगितलं होतं की, सूरजचा जो ती अट्टाहास घेऊन बसली आहे त्यावर मी बोललं पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा ती ड्यूटी पूर्ण करेल. वैभवनेदेखील प्रयत्न केले. पण आर्या बोलल्यामुळे प्रॉब्लेम झाले”. वर्षा ताई पुढे म्हणतात,”काम व्हायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला किती किंमत द्यायची. किती सांगायचं… सांगायचं तेवढं सांगितलं.. त्यापुढे काम व्हायला पाहिजे की नको. मग आता करुदे”.

निक्कीवरुन अभिजीत अन् जान्हवीची होतेय चिडचिड

आजच्या भागात निक्कीवरुन अभिजीत आणि जान्हवी चिडचिड करताना दिसणार आहेत. जान्हवी म्हणतेय,”तुमचा मुद्दा बरोबर आहे हे जगाला दाखवा. तेव्हा ते बोलतील हे मुद्देसुद आणि व्यवस्थित बोलतात. निक्की चुकतेय हे तिलाही माहिती आहे”. पुढे अभिजीत म्हणतो,”निक्कीने आपल्याला दाबलं आणि आपण दाबले गेलो. जी गोष्ट चुकीची आहे त्याबद्दल बोलणार नाही मग कशाबद्दल बोलणार?. मी तिला प्रत्येकवेळी टोकतोय, बोलतोय. पूर्ण दिवस तिच्यामागे लागा”. त्यावर जान्हवी बरोबर आहे, असं म्हणते.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नियमही मोडलेत

‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube