Supriya Sule : होय, ही घराणेशाहीच आहे पण.. सुप्रिया सुळेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवत मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नियुक्ती केली. त्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. आज याच आरोपांना खासदार सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे […]

supriya sule sharad pawar

supriya sule sharad pawar

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवत मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नियुक्ती केली. त्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. आज याच आरोपांना खासदार सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले.

कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी विरोधी पक्षांकडून होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपांबाबत विचारले. त्यावर सुळे म्हणाल्या, होय ही घराणेशाहीच आहे आणि मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.

BJP च्या अहवालातील आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाकारले; डॉ. सावंत म्हणाले, माझ्यावरचे आरोप खोटे

जे लोक आरोप करतात त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी लोकसभेत दाखवून दिली आहे. जेव्हा देशात मला एक नंबरचे रँकिंग मिळते तेव्हा माझे वडील हे रँकिंग देत नाहीत. शरद पवार यांची मुलगी आहे म्हणून मी संसदरत्न होत नाही. तेव्हा घराणेशाही दिसत नाही, ती फक्त सोयीप्रमाणे दिसते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

अजितदादा नाराज आहेत का ?

अजित पवार नाराज आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे म्हणाल्या, केंद्रातील माझं रिपोर्टिंग शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असेल आणि राज्यातील रिपोर्टिंग अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडे असेल. कार्यकारी अध्यक्षपदासाठी अजित पवार यांनी लॉबिंग केले का या प्रश्नावर त्यांनी हा पक्ष लॉबिंगने नाही तर चर्चेतून चालतो असे उत्तर दिले. अजितदादांचा राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा रोल मोठा आहे. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याची भूमिका मुख्यमंत्र्यांसारखीच असते. तसेच मला कार्यकारी अध्यक्षपद मिळेल याची मला काहीच कल्पना नव्हती असे सुळे म्हणाल्या.

बोट बुडेल तेव्हा ‘तो’ उंदीर पहिला पळेल, राजन विचारेंनी म्हस्केंना डिवचले !

Exit mobile version