Download App

शिरसाटांविरुद्ध अंधारे मैदानात, अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार !

Sushma Andhare : ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली आहे.

म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. या भूमिकेतूनच मी आता संजय शिरसाट यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणर आहे, अशी माहिती अंधारे यांनी दिली.

ठाकरेंना सावरकरांचा खरंच आदर असेल तर.., रणजित सावरकरांनी व्यक्त केली नाराजी

त्या पुढे म्हणाल्या, संजय शिरसाट यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संभाजीनगर, पुणे येथील परळी या ठिकाणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण, एकाही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. म्हणून महिला आयोगाकडे तक्रार वर्ग करण्यात आली. त्यानंतर आयोगाने पोलिसांना तक्रार नोंदविण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

सोशल मीडियावर पोस्ट करताय तर सावधान… पोलिसांचा असणार वॉच!

या प्रकरणात पुढे काय कार्यवाही होणार हे लवकरच कळेल मात्र म्हातारी मेल्याचे दुःख नाही परंतु काळ सोकावतोय. ज्याप्रमाणे शिंदे गटाचे आमदार महिलांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करताना दिसत आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी चाप बसला पाहिजे.

शिंदे-फडणवीस पाठीशी घालतात 

ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणांमध्ये लवकर कारवाई करून लक्ष घातले त्याचप्रमाणे संजय शिरसाट प्रकरणी देखील लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  मात्र शिंदे फडणवीस सरकारकडून खुर्ची टिकविण्यसाठी अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

सुषमा अंधारे यांच्याविरोधात कुणाकडून हा कट रचले जात आहेत. याचेही कारण त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुषमा अंधारेंच्या पाठीवर ईडी, सीबीआय, भ्रष्टाचाराचे बॅगेज नाहीत. त्यामुळे बाईपणावर हल्ले करणे जास्त सोपे आहे. मी कोणतेही व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. म्हातारी मेल्यांच दुःख नाही पण, काळ सोकावतोय त्यामुळेच मी तक्रार केल्याचे अंधारे यांनी सांगितले.

 

Tags

follow us