Download App

‘माझं सरकार खेकड्यांनी फोडलं’ : उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांवर घणाघात

Uddhav Thackeray : माझं सरकार वाहून गेलं नाही, खेकड्यांनी धरण फोडलं, असं म्हणतं शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेना आमदार आणि विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जबाबदार धरलं आहे. ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलाखतीचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. या टीजरमध्येच उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर घणाघाती टीका केली.

Jayant Patil : अजितदादांनी दिला बक्कळ निधी; जयंत पाटील म्हणाले, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून…

आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा या शीर्षकाखाली ही मुलाखत दोन भागांत प्रसारित करण्यात येणार आहे. बुधवारी पहिला आणि गुरुवारी दुसरा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेच्या यु ट्यूब चॅनेलवर हा पॉडकास्ट सुरू करण्यात आला आहे. लोकांच्या मनातले प्रश्न तसेच राज्याच्या भविष्याचे विचार.. आता या आवाज कुणाचा शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्टमधून ऐकायला मिळणार आहे.

2019 मध्ये उद्धव ठाकरेंनीच पाठीत खंजीर खुपसल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावरही ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. आम्ही खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीने काय खुपसले की तुम्ही त्यांच्यासोबत गेला. रोज उठसूट दिल्लीला मुजरा मारणे ही आपली संस्कृती नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.

ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावतो?, अशोक चव्हाणांचा सवाल…

तानाजी सावंत ठाकरेंच्या रडारवर :

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात 2 जुलै 2019 रोजी चिपळूनजवळील तिवरे धरण फुटून 19 जणांचे प्राण गेले होते. या धरणफुटीला खेकडे जबाबदार असल्याचं विधान तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. खेकड्यांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होता, त्यातूनच गळती सुरु झाली, असं ते म्हणाले होते. त्यानंतर माध्यमांमध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. तसंच राजकीय पक्ष आणि नेत्यांनीही सावंत यांच्यावर प्रचंड टीका केली होती. याच विधानाचा संदर्भ घेत ठाकरे यांनी सावंत यांच्यावर टीका केली.

मी 150 बैठका घेतल्या.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी माझा पुढाकार होता, असा गौप्यस्फोटही तानाजी सावंत यांनी केला होता. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतरच सत्ता बदलायचं काम चालू होतं, आमदारांचं मतपरिवर्तनाचं काम आमचं चालू होतं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या मिटींग होत होत्या. आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्या जवळपास दोन वर्षात 100 ते 150 मिटींग झाल्या. मराठवाडा, विदर्भातले आमदार असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असतील त्यांचं मतपरिवर्तन करण्याचं काम सुरु होतं. हे सांगून करत होतं. झाकून करत नव्हतो, उघड माथ्यानं आपण करत होतो, असं सावंत म्हणाले होते.

Tags

follow us