Weather Update : पुढील 3-4 तास काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं […]

Maharashtra Rain

Maharashtra Rain

Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

त्यामध्ये राज्यात हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यासाठी पुढील 3-4 तास अतिखबरदारीचे असणार आहेत. कारण पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Maharashtra Rain : राज्यात अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान, बळीराजाचा पाय खोलात

त्यामुळे पुढील काही तास घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दुपारी 1.30 वाजता ही माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान याअगोदरच पुढील चार दिवस राज्यासाठी अतिमहत्त्वाचे असणार आहे. कारण वादळी वाऱ्यासह तीव्र पाऊस राज्यात थैमान घालणार आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची ही शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

Exit mobile version