विदर्भावर अवकाळीचे ढग, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात उन्हाचा कडाका; हवामानाचा अंदाज काय?

आताही हवामान विभागाने विदर्भात पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कडाक्याच्या उन्हाचा इशारा दिला आहे.

Rain Alert

Rain Alert

Maharashtra Weather Update : राज्यात एप्रिल महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मारा होत आहे. होळीनंतर उष्णतेत वाढ होण्याची शक्यता सांगितली होती. त्यानंतर उष्णतेत वाढ (Maharashtra Rain) झाली असली तरी सोबत अवकाळी पावसाचं संकटही आलं आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आताही हवामान विभागाने विदर्भात पावसाचा तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कडाक्याच्या उन्हाचा इशारा दिला आहे.

राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.

राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना मिळाला अलर्ट

अशी परिस्थिती असताना राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यात सूर्य आग ओकणार आहे.

हवामान विभागाने विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तरी देखील येथील काही जिल्ह्यांत उष्णता कमालीची वाढली आहे. चंद्रपूरमध्ये 40.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूरमध्ये उन्हाचेड चटके जाणवत होते. पुणे शहरात आज तापमान सामान्य राहील. अशीच स्थिती मुंबई शहर आणि उपनगरांत राहणार आहे.

पालकांनो सावधान, मुलांमध्ये वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; अहवालातून धक्कादायक माहिती..

मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असेही हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. काही भागात तर तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे.

Exit mobile version