Download App

राज्यावर पावसाचे ढग! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

  • Written By: Last Updated:

Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील हवामानात पुन्हा एकदा बदल झाला आहे. हवामानानं नव्यानं तालरंग दाखवायला सुरूवात केली. थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, येत्या २४ तासांत अशीच परिस्थिती राहणार असून काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, रुग्णवाहिकाही अडकलेली पाहून राज ठाकरेंनी दिला दम, ‘पुन्हा बांबू लावला, तर…’ 

उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. थंडीसोबतच धुक्याचा कहरही पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढउतार होत आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हवामान बदलामुळं विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडेल. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर बनताच अयोध्येचा चेहरामोहरा बदलेल 

धुळे आणि नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेशात वादळासह मुसळधार पाऊस पडू शकतो. तामिळनाडू आणि केरळमध्येही अवकाळी पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहे. अवकाळीमुळं तूर, कांदा, हरभरा पिकाचं नुकसान होण्याच्यी शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर कोकणातून उत्तरेकडे पसरलेल्या बाष्पााच ढग तयार झाल्यामुळं हवामानावर परिणाम दिसून येत आहेत.

मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असती तरी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा अंदाज नाही. मात्र, दाट धुक्याच्या प्रभावामुळे मुंबईत गुलाबी थंडी पडण्याची शक्यता आहे. ठाणेकरांनाही थंडीचा कडाका जाणवू शकतो.

follow us